मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

CM Eknath Shinde Live : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

CM Eknath Shinde Live : शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार?

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देणार?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं आहे.

  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं आहे. या भाषणात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आपले शत्रू आहेत खूर्चीच्या लालसेपोटी युती तोडली सेना-भाजप युतीसाठी मतं मागितली युतीचं सरकार न येता महाविकासआघाडीचं सरकार आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे - अडीच वर्षातशिवसैनिकांवर खोटे आरोप झाले, सत्तेत असताना शिवसेनेवर अन्याय झाला - बाळासाहेबांना सत्तेची लालसा नव्हती - बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचा फोटो लावून निवडणूक लढलो - दिल्लीतही शिवसेनेची ताकद मोठी - आम्ही कधीही प्रतारणा, विश्वासघात करणार नाही - हा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करत आहोत - पक्षाच्या कार्यकर्त्याला नोकर समजलात तर कोणीही सहन करणार नाही -ग्रामपंचायतीत तुम्ही सहाव्या क्रमांकावर गेलात, लोकांनी तुम्हाला नाकारलं - अडीच वर्षांनी गटप्रमुखांची आठवण आली, वर्षा-मातोश्रीवर प्रवेश नव्हता. आम्ही क्रांती केली म्हणून गटप्रमुखांना चांगले दिवस आले आहेत. -गद्दार कोण खुद्दार कोण, ये पब्लिक है सब जानती है -मुन्नाभाईला पण लोक प्रेम देतात - राष्ट्रवादीसोबत जाण्याची चूक केली - खोके वगैरे बोलता, वेळ आली की बोलीन, माझ्यापेक्षा जास्त हिशोब कुणाकडे असेल? हे सगळं महाराष्ट्रात बोलेन - आम्ही जर शब्द दिला असता तर पाळला असता, बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता तो पाळला, असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं - निकाल लागला त्यादिवशी सगळे दरवाजे उघडे आहेत, असं सांगितलं, म्हणजे तेव्हाच सगळं ठरलं होतं. - सगळे दरवाजे उघडे याचा अर्थ काय? - चूक झाली होती ती आता दुरूस्त केली - आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत - सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? हे महाराष्ट्र-देश बघतोय - बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना आसमान दाखवयाची वेळ येणार नाही, तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे - शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून शपथपत्र घेत आहेत, हा खर्चही शिवसैनिकांना करावा लागतोय. - आम्ही ठेचा खाऊन मोठे झालो म्हणून तुम्हाला ठेचलं आहे. - बाप चोरणारी टोळी म्हणाले, आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे, असं आम्ही म्हणायचं का? - दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदींचा हस्तक होणं बरं - मी घरी बसणारा नेता नाही -मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ठेवलं -मी गेलो म्हणून त्यांचंही गणपती दर्शन - निवडणूक जनतेच्या हातात असते - मुंबईचा मराठी माणूस बाहेर फेकला गेला, मुंबईत मराठी टक्का कमी झाला याला जबाबदार कोण? मराठी माणसाच्या नावावर राजकारण, स्वत:चा स्वार्थ साधायचा, त्यांना मुंबईकर धडा शिकवतील
First published:

Tags: Cm eknath shinde, Uddhav thackeray

पुढील बातम्या