मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत', अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

'सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत', अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने (BJP) कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलं होतं.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 ऑगस्ट : मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने (BJP) कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले मला माहिती नाही, पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच नव्हता, असं फडणवीस म्हणाले. 'मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मी साक्षीदार आहे, सगळ्या वाटाघाटी मी केल्या होत्या, यामध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला नव्हता. सगळं काही निघून गेलं. ते बेईमानी बाबत बोलतात पण सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत झाली होती. आमच्यासोबत जे निवडून आले ते जर आम्हाला सोडून विरोधकांशी हात मिळवणी करतात आणि सरकार स्थापन करतात, यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो?' असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. 2019 च्या निवडणुकीवेळी भाजप नेते अमित शाह मातोश्रीवर आले होते, तेव्हा त्यांच्याकडून अडीच वर्ष शिवसेनेचा तर अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेना पहिल्या दिवसापासून करत आहे. भाजपने मात्र वेळोवेळी हा दावा प्रत्येकवेळी फेटाळून लावला. 2019 ला फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे नरेंद्र मोदींपासून अमित शाहंपर्यंत सगळे नेते प्रचार सभेत बोलले होते, तेव्हा शिवसेनेकडून कोणताच आक्षेप का घेतला गेला नाही, असा सवाल भाजप नेते तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही उपस्थित केला होता. भाजपकडून अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला नसल्याचं पहिल्या दिवसापासून सांगितलं गेलं, पण एकनाथ शिंदे यांनी याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या