मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषयच संपवला!

उद्धव ठाकरेंना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषयच संपवला!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या बैठकीचं आयोजन केलं होतं.

  • Published by:  Shreyas
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीसाठी देशभरातल्या जवळपास सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सहभाग दर्शवला. पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं. राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) लवकरच होईल, थोडा वेळ द्याल का नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. तसंच मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा कोणताही संबंध नाही, असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 48 सुरू केलं आहे. हे मिशन भाजप-शिवसेना युतीसाठी असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा एकनाथ शिंदे यांना या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर देणं टाळलं, पण नंतर फ्रेंडशिप डे सगळ्यांसाठी असतो, माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजितदादा मित्र राज्यातल्या पूरस्थितीचं निवेदन देण्यासाठी अजित पवार मला भेटले होते. तेव्हा तुम्ही दोघं चांगलं काम करताय, निर्णयही पटापट घेत आहात, असं अजित पवार म्हणाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. तसंच अजित पवार आमचे चांगले मित्र असल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी दिली. फडणवीसही दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. फडणवीस यांनीही राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार एका आठवड्यात होईल याचे संकेत दिले आहेत. पुढच्या आठवड्यात तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारला, तेव्हा तुम्ही विचार करताय त्याआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं उत्तर त्यांनी दिलं.
First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray

पुढील बातम्या