मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सगळ्यांना नोकर समजल्यामुळे...', थापावरच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार

'सगळ्यांना नोकर समजल्यामुळे...', थापावरच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर पलटवार

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हयात घालवलेले चंपासिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर अरविंद सावंत यांनी थापावर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

ठाणे, 26 सप्टेंबर : बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत हयात घालवलेले चंपासिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. चंपासिंग थापा हे बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरायचे, तर मोरेश्वर राजे हे बाळासाहेबांचे स्वीय सहाय्यक होते. मोरेश्वर राजे 35 वर्ष तर थापा 30 वर्ष बाळासाहेबांसोबत होते. चंपासिंग थापा यांना तर बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेवेळी त्यांच्या पार्थिवाजवळची जागा देण्यात आली होती.

चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गंभीर आरोप केले. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

थापाच नाही तर बाळासाहेबांच्या जवळची आणखी एक व्यक्ती मातोश्रीबाहेर, 35 वर्षांचं नातं एका सेकंदात...

अरविंद सावंत यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'थापा मध्ये मला येऊन भेटले होते. बाळासाहेबांना हे आवडलं नसतं, असं ते म्हणाले. सत्तेसाठी जी तडजोड झाली त्याने थापा दुखावले गेले होते. हिंदुत्वाचा विचार आपण पुढे नेताय, असं थापा म्हणाले. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे,' असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.

'अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे. सगळ्यांना नोकर समजलं त्यामुळे त्यांची आज ही परिस्थिती झाली आहे. बाळासाहेब आणि थापा एक वेगळं समीकरण आहे. थापा यांच्यावर केलेले आरोप हा नेपाळी समाजाचा अपमान आहे, त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो,' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांची सावली चंपासिंग थापा

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray