मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बांगर माझा आवडता चेला, गुवाहाटीला न येता इकडे थांबला कारण...' एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

'बांगर माझा आवडता चेला, गुवाहाटीला न येता इकडे थांबला कारण...' एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सोमवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या हिंगोलीमध्ये जाहीर सभा घेत मोठा गौप्यस्फोट केला.

    हिंगोली, 9 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सोमवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या हिंगोलीमध्ये जाहीर सभा घेत मोठा गौप्यस्फोट केला. संतोष बांगर हा माझा आवडता चेला आहे. तो मुद्दाम मागे थांबला आणि त्याने एक एक जण पुढे पाठवला. वेळेवर त्याने पत्ता खोलला आणि वेळेवर सभागृहात योग्य निर्णय घेतला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये नव्हते. महाराष्ट्रात असताना त्यांनी आपण ठाकरेंसोबतच असल्याचं सांगितलं, पण विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सकाळी विधिमंडळातच संतोष बांगर शिंदेंच्या गटात दाखल झाले. आपल्याला लोकांनी नवीन नावं दिली, पण आपण त्यांना कामातून उत्तरं देऊ. हजारो लोक आमचं स्वागत करत आहेत, हे त्यांना उत्तर आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 'जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं, ते आपण आता दुरुस्त केलं आहे. एकीकडे बाळासाहेब आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा फोटो लावून आपणं मतं मागितली होती. युतीचे सरकार स्थापन व्हावं म्हणून आपल्याला जनतेने पूर्ण बहुमत दिलं होतं, पण आपण काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत आहोत, त्यामुळे हजारोंच्या संख्येने लोक स्वागत करत आहेत,' असं मुख्यमंत्री म्हणाले, आमदारांसोबत खासदारही सोबत आले, यांच्या मतांची टक्केवारी आपण पाहिली तर लक्षात येईल आमची भूमिका योग्य आहे, असं वक्तव्यही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या घोषणा - आमचे सरकार स्थापन होताच पोलिस भरती, व रिक्त जागांना प्राधान्य - 80,000 जागांची भरती करणार - मी निती आयोगाच्या बैठकीत होतो.. राज्याचे हजारो कोटींचे प्रस्ताव मान्य होतील - मी येताना शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं, सर्वात जास्त मदत सरकार करेल - कळमनुरी येथे शेळी मेंढी विकास महामंडळाच्या कार्यालयासाठी सकारात्मक विचार केला जाईल - बंजारा देवस्थान साठी पाच कोटी रूपये निधीची घोषणा - विपश्यना केंद्रासाठी निधीची घोषणा -औंढा नागनाथ देवस्थान तीर्थक्षेत्र विकास साठी भरीव निधी दिला जाईल. कळमनुरी शहरातील रस्ता चौपदरीकरण साठी निधी , ग्रामीण रस्त्यांसाठी निधी - हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुका निर्मितीसाठी सकारात्मक विचार - हिंगोली लोकसभा क्षेत्रातील माहूरगड, नर्सी नामदेव पर्यटन विकासासाठी विशेष चालना दिली जाईल - मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे... त्याला सर्व प्रयत्न करूध चालना देण्यात येईल... तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या