Home /News /maharashtra /

दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार अंतिम चर्चा? एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार अंतिम चर्चा? एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती

आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्याबाबत आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली.

    नवी दिल्ली 06 ऑगस्ट : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळून आणि शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेऊन महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर या मुद्द्यावरुन तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरुन सडकून टीका करत आहेत. अशात आता आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला गेले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्याबाबत आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. वर्षा राऊत ईडीच्या रडारवर; दोन टीमकडून संजय राऊत आणि वर्षा राऊतांची स्वतंत्र चौकशी आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त “आझादी का अमृतमहोत्सव” सोहळ्यासाठी राष्ट्रीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत. तर उद्या राष्ट्रीय नीती आयोगाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. आपण या दोन महत्त्वाच्या बैठकांसाठीच दिल्लीत आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. या नियोजीत बैठकांव्यतिरीक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचीही शक्यता वर्तवली जात होती. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याचा मंत्रिमंडळ विस्तारासोबत काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदेंकडून 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख, मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं? मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. विस्तार पुढच्या आठवड्यात होणार का? असा सवाल विचारला असता, पुढचा आठवडा कशाला? लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या