मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकीटमारी, दोन चोरांना अटक

मुख्यमंत्र्यांच्या सभेत पाकीटमारी, दोन चोरांना अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नांदेड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पाकीटमारी झाली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी हात सफाई केली.

    नांदेड, 8 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नांदेड येथील कार्यकर्ता मेळाव्यात पाकीटमारी झाली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी हात सफाई केली. नांदेड येथील भक्ती लॉस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता मेळावा झाला . त्यावेळी मोठी गर्दी झाली होती .याच गर्दीत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्याना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अविनाश ढगे आणि शेख अहमद अशी या चोरट्याची नावे आहे . त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले. एकनाथ शिंदे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. मराठवाड्याचा हा दौरा संपवून ते पुन्हा मुंबईमध्ये येणार आहेत. कारण उद्या म्हणजेच मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. शिवसेनेचे एकेकाळचा गड असलेल्या मराठवाड्यामधून सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत. यातल्या किती आमदारांना मंत्रिपद मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे. भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. संजय शिरसाट हे औरंगाबादहून मुंबईला निघाले आहेत. मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांचं नावही कालपर्यंत आघाडीवर होतं, पण आज अचानक टीईटी घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुलांची नावं आल्यामुळे सत्तार यांना आता मंत्रिपद मिळणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या