मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा वेगळं वळण? मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा वेगळं वळण? मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रकाश आंबडेकर-उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रकाश आंबडेकर-उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रकाश आंबडेकर-उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 नोव्हेंबर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करतील आणि राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती भीमशक्तीची युती होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण या चर्चांमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृह येथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचा मेसेज मला कालच आला. राजगृहाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत इंदू मिलच्या स्मारकाबाबत चर्चा झाली. मुंबईमध्ये 14 एकर जागा आहे. मुंबई भारताचं इंटरनॅशनल सेंटर आहे. काँग्रेस आणि त्यानंतरच्या सरकारमध्ये झालं नाही. तुमच्या कार्यकाळात त्या 14 एकर जागेमध्ये जर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर काढता आलं, तर त्याचा प्रयत्न करावा, याबाबत 15-20 मिनिटं चर्चा झाली, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

ठाकरेंसोबत जाणार?

येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर येणार आहेत, त्यामुळे शिवसेना-वंचित च्या युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्याआधीच ही भेट झाल्यामुळे याच्या टायमिंगबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं.

महाविकासआघाडी सरकार असताना काही घटकांची माझ्याशी चर्चा झाली. तेव्हा महाविकासआघाडी एकत्र राहणार असेल, तर वंचित बहुजन आघाडीचा त्यात कसा समावेश होईल, याचा आराखडा तयार केला आहे का? नाना पटोले स्वतंत्र लढणार असल्याचं बोलत होते, त्यामुळे महाविकासआघाडी म्हणून तुम्ही वंचित बहुजन आघाडीशी स्वतंत्र बोलणार आहात का? असं मी त्यांना विचारलं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही येत आहे, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

'प्रबोधनकार ठाकरेंच्या पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम 20 तारखेला आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी होता. प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा संबंध जवळचा होता, त्यामुळे त्यांनी मला बोलावलं. महाविकासआघाडीचं त्यांचा काही ठरत नाही, तोपर्यंत राजकीय चर्चेचं पुढे काही होईल, असं मला दिसत नाही,' अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

'आम्ही भाजपसोबत जाणार नाही, तसंच जे भाजपसोबत जातील त्यांच्यासोबतही आम्ही जाणार नाही, अशी आमची भूमिका आहे,' असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. महाविकासआघाडी जर प्रतिसाद देणार नसेल, तर आम्हाला स्वत:च्या बळावर निवडणुका लढवाव्या लागतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

First published:

Tags: Cm eknath shinde, Prakash ambedkar