मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज, राणे ते मनोहर जोशी, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं सगळंच बाहेर काढलं!

राज, राणे ते मनोहर जोशी, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं सगळंच बाहेर काढलं!

एकनाथ शिंदेनी बाहेर काढला इतिहास, उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदेनी बाहेर काढला इतिहास, उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा घेण्यासाठी खेडमध्ये आले होते. खेडच्या गोळीबार मैदानात झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा इतिहासच बाहेर काढला.

खेड, 19 मार्च : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभा घेण्यासाठी खेडमध्ये आले होते. खेडच्या गोळीबार मैदानात झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा इतिहासच बाहेर काढला. उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना, राज ठाकरे, नारायण राणे, मनोहर जोशी, रामदास कदम यांना कसा त्रास देण्यात आला, याची उदाहरणं दिली.

'एखादा कार्यकर्ता मोठा व्हायला लागला की यांची पोटदुखी सुरू होते. गुलाबराव पाटील, रामदास कदम यांच्या भाषणांना टाळ्या मिळायला लागल्या, त्यानंतर त्यांचा आवाज बंद करण्यात आला. नारायण राणे, गणेश नाईकही सोडून गेले.' असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

'राज ठाकरे काय मागत होते? जो भाग कमजोर आहे तो मला द्या, मी शिवसेना मोठी करतो, असं ते म्हणत होते. ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरेंच्या घरी गेलो. बाळासाहेबांनी भगवा फडकवला त्याला खाली उतरवू देऊ नका, अशी विनंती मी राज ठाकरेंना केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. मी स्वत:साठी गेलो नाही, ठाण्याचा भगवा उतरू नये म्हणून गेलो', असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

अजितदादांचा डोळा ते पवारांचा बल्ब, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सांगितला पुढचा धोका!

शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता, तुम्हाला बोलताना थोडंतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत, तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मनोहर जोशींनी बाळासाहेबांसोबत खस्ता खाल्ल्या, त्यांना तुम्ही व्यासपीठावरून खाली उतरवलंत. असा कोणता पक्षप्रमुख आपल्याच नेत्यांविरोधात कारस्थानं करू शकतो? बाळासाहेब असते तर त्यांनी मनोहर जोशींसोबत असं केलं नसतं, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.

'सगळे दरवाजे उघडे ठेवा, शेवटी फक्त...', शिंदेंचं ठाकरेंना चॅलेंज!

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray