मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मराठी मनाला यामुळे दु:ख', रोहित पवारांनी Photo शेअर करत साधला शिंदेंवर निशाणा

'मराठी मनाला यामुळे दु:ख', रोहित पवारांनी Photo शेअर करत साधला शिंदेंवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीमध्ये निती आयोगाची बैठक बोलावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

    नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीमध्ये निती आयोगाची बैठक बोलावली होती, या बैठकीला देशाचे जवळपास सगळेच मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनीही या बैठकीला हजेरी लावली, पण या बैठकीतल्या एका फोटोवरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे आहेत. 'एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!', असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना दुसऱ्या रांगेत उभ केलं तर त्यांनी ती सभा सोडली, मुख्यमंत्र्यांनी याची आठवण ठेवावी. मी केवळ उदाहरण सांगितल, मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिली नाही. ती सभा मोदींची होती मला नवा वाद उभा करायचा नाही. प्रोटोकॅाल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट असते', असं जयंत पाटील म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार कधी? एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत, त्यामुळे दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्तार आणि सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचा काहीही संबध नाही, असं शिंदे आणि फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या