मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खूशखबर! महाराष्ट्रातील 'या' नागरिकांसाठी एसटीचा प्रवास फ्री, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

खूशखबर! महाराष्ट्रातील 'या' नागरिकांसाठी एसटीचा प्रवास फ्री, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी चांगल्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 16 ऑगस्ट : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी चांगल्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक निर्णय म्हणजे पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. तसेच राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांचा तीन टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्याबसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. (शिंदे-फडणवीस सरकारचं सत्तेत येताच सरकारी कर्मचाऱ्यांना पहिलं गिफ्ट, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा) राज्यातील नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढेत तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल. दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखांचे विमा संरक्षण गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या