मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालं तेव्हा दिल्लीत एकनाथ शिंदे काय करत होते? हा VIDEO पाहाच!

मुंबईत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू झालं तेव्हा दिल्लीत एकनाथ शिंदे काय करत होते? हा VIDEO पाहाच!

उद्धव ठाकरेंचे आरोप एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंचे आरोप एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार प्रहार केला, तर उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार प्रहार केला, तर उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू झालं तेव्हाच महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच तिकडे दिल्लीमध्ये शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हातात धनुष्यबाण दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा धनुष्यबाण ताणला. शिवसेनेमध्ये सध्या धनुष्यबाणावरूनच सामना सुरू आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळावं, यावरून ठाकरे आणि शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे आहे. उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ठाकरे-शिंदेंमध्ये आरोप-प्रत्यारोप उद्धव ठाकरेंनी आमचा मिंधे गट असा उल्लेख केला, पण आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी मिंधेपणा कोणी केला? सरकार बनवण्यासाठी काँग्रस-राष्ट्रवादीसोबत कोण गेलं? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे, असं आम्ही म्हणायचं का? असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला. भाजपवर निशाणा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. हिंमत असेल तर समोर या. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. महिन्याभरात मुंबई महापालिका आणि राज्याच्याही निवडणुका लावून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना दिलं. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली, पंतप्रधानांनाही बहीण म्हणून याच मिळाल्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला. शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या