मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्र्यांच्या 'गोविंदा'बद्दलच्या निर्णयाला पुण्यातून विरोध, पण तथ्य काय?

मुख्यमंत्र्यांच्या 'गोविंदा'बद्दलच्या निर्णयाला पुण्यातून विरोध, पण तथ्य काय?

दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना (Dahi Handi Govinda) सरकारी नोकरीमध्ये (Government Job) आरक्षण देण्याचा मोठा निर्णय शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने घेतला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 18 ऑगस्ट : दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना (Dahi Handi Govinda) सरकारी नोकरीमध्ये (Government Job) आरक्षण देण्याचा मोठा निर्णय शिंदे (CM Eknath Shinde) सरकारने घेतला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या 5 टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे. पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे. काही विद्यार्थी वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करत असतात आणि कुठेतरी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल अशी आशा विद्यार्थ्यांना असते .या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होताना दिसून येत आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तथ्य काय? गोविंदांना राज्य सरकारकडून कोणतंही वेगळं आरक्षण देण्यात आलेलं नाही. खेळाडूंसाठी राखीव असलेल्या 5 टक्के कोट्यातूनच गोविंदांना आरक्षण देण्यात आलेलं आहे, म्हणजेच आता गोविंदांचा यात समावेश झाल्यामुळे 5 टक्के कोट्यातून सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची यादी आणि स्पर्धा आणखी मोठी होणार आहे. इतर 95 टक्के नोकऱ्यांवर मात्र याचा परिणाम होणार नाही. खेळाडूंसाठी असलेल्या संस्थांकडून मात्र याला अजूनपर्यंत विरोध झालेला नाही. स्पोर्ट्स कोट्यातून नक्की कशी मिळते सरकारी नोकरी? खेळांपासून पात्रतेपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे फायदा काय? खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल. गोविंदांसाठी आणखी घोषणा दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.
First published:

पुढील बातम्या