मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे-फडणवीस 18-18 तास काम करतात, तर उद्धव ठाकरे... अब्दुल सत्तारांचा घणाघात

शिंदे-फडणवीस 18-18 तास काम करतात, तर उद्धव ठाकरे... अब्दुल सत्तारांचा घणाघात

 कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

    जालना, 15 ऑगस्ट : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे 18-18 तास काम करतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते किती काम करायचे, हे माहिती नाही असा टोला अब्दुल सत्तार यांनी हाणला आहे. जालन्यात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अब्दुल सत्तार बोलत होते. टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं आली होती, पण टीईटी घोटाळा मीडिया ट्रायल होती. तो विषय आता संपलेला आहे, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर शिंदे गटाला फक्त झाडी आणि डोंगर मिळाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं, त्यालाही अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं. विरोधकांनी जसे चष्मे लावले तसं त्यांना दिसतं. आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू असं सत्तार यांनी म्हंटलंय. राज्यातल्या शासकीय कार्यालयांमधले कर्मचारी आता फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे, त्यावरही सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. अब्दुल सत्तार यांना मुनगंटीवार यांच्या या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. हॅलो चांगलं आहे, वंदे मातरमही चांगलं आहे आणि गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगलं आहे, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या