मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकारकडून दसऱ्याची भेट, मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष रखडलेला 'मॅटर' एका दिवसात संपवला!

राज्य सरकारकडून दसऱ्याची भेट, मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष रखडलेला 'मॅटर' एका दिवसात संपवला!

या बैठकीनंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीनंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने एसटी चालक-वाहक पदाच्या भरतीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना दसऱ्याची भेट दिली आहे. एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 ऑक्टोबर : राज्य सरकारने एसटी चालक-वाहक पदाच्या भरतीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना दसऱ्याची भेट दिली आहे. एसटीच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलं आहे. 2019 साली हे चालक आणि वाहक भरती प्रक्रियेत पात्र झाले होते. या पात्र उमेदवारांपैकी 27 पुरुष उमेदवारांना तर 22 महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य परिवहन महामंडळामध्ये 2019 मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील 1431 पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर मंत्रालयात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये 203 महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून 142 महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी 22 महिला उमेदवारांना आज सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र देण्यात आले. 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena