मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'गेलं सरकार गुर्मीत काम करत होतं', मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

'गेलं सरकार गुर्मीत काम करत होतं', मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

अडीच वर्षात या विकासाभिमुख प्रकल्पांची गती कमी झाली. आता पुन्हा एकदा हे सरकार जोमानं कामाला लागलंय

अडीच वर्षात या विकासाभिमुख प्रकल्पांची गती कमी झाली. आता पुन्हा एकदा हे सरकार जोमानं कामाला लागलंय

'अडीच वर्षात या विकासाभिमुख प्रकल्पांची गती कमी झाली. आता पुन्हा एकदा हे सरकार जोमानं कामाला लागलंय'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Navi Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

नवी मुंबई, 25 सप्टेंबर : 'आम्ही सत्यासाठी सत्तेत आहोत, सत्तेसाठी नाही. युती म्हणून लढलो आम्ही, निवडून आलो. आम्ही ती चूक दुरुस्त केली. आमचं सरकार देणारं, घेणारं नाही. गेलं सरकार गुर्मीत काम करत होतं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मेट्रो प्रकल्प काम रखडलं असतं, ते काम पुन्हा वेगानं सुरू केलं. राज्य विकासासाठी, केंद्र सरकार खंबीरपणे आपल्या मागे उभं आहे. मी राजकीय बोलणार नाही. आम्ही सत्यासाठी सत्तेत आहोत, सत्तेसाठी नाही. युती म्हणून लढलो आम्ही, निवडून आलो. आम्ही ती चूक दुरुस्त केली. सत्ता आणि सत्य कोणी सांगायची आवश्यकता नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावला.

माथाडी कामगारांना पिळणाऱ्या काहींचा चोख बंदोबस्त केला जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आवश्यकता असेल तर कायद्यात बदल करणार आहे. प्रवीण दरेकर मुंबै बँक माध्यमातून 200 कोटी माथाडी कामगार गृहयोजनेला देणार आहे, असंही शिंदे म्हणाले.

(वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा थेट इशारा)

'देवेंद्र फडणवीस यांच्या 5 वर्ष सरकारमध्ये मला त्यांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या,अनेक प्रकल्प सुरू केले. ते सर्व गेल्या अडीच वर्षात या विकासाभिमुख प्रकल्पांची गती कमी झाली. आता पुन्हा एकदा हे सरकार जोमानं कामाला लागलंय, असं म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं.

'मराठा समाज न्यायालयीन लढा सुरू आहे. मात्र सुविधा देण्याचं काम आमच्या सरकारने सुरू केलंय. सारथी, हॉस्टेल अश्या अनेक योजनांवर काम सुरू आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नरेंद्र पाटील यांची योग्यता लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्तीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी मान्य करतो. नरेंद्र पाटील हे या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मंजुर करतो, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

(दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना पाठीत खंजीर खुपसण्याच्या वक्तव्यावरून दिले सणसणीत उत्तर)

कष्टकरी आणि राबणाऱ्या माथाडी कामगारांना, अण्णासाहेब पाटील यांनी एक केलं,बळ दिलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही सहभाग होता. अण्णासाहेब पाटील यांचं मराठा समाजाला न्याय मिळावा यात मोठं योगदान दिलं. शेतकरी आणि कामगार या चाकांवर, राज्याच्या विकासाची घौडदौड आहे. हे सरकार समाजातील प्रत्येक सर्वसामान्यांचं सत्कार करणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

First published: