Home /News /maharashtra /

VIDEO : विठुराया वारकऱ्यांचा कैवारी, अपघातात वाचवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून मोठी मदत, एकनाथ शिंदेंची वारकऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलवर बातचित

VIDEO : विठुराया वारकऱ्यांचा कैवारी, अपघातात वाचवलं, नंतर मुख्यमंत्र्यांकडून मोठी मदत, एकनाथ शिंदेंची वारकऱ्यांसोबत व्हिडीओ कॉलवर बातचित

मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला.

    सांगली, 7 जुलै : जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धावल्यानंतर खडबडून जागे झालेले बंडखोर आमदार अनिल बाबर (Anil Babar) वारकऱ्यांच्या भेटीला धावले आहेत. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडून जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजारांची मदत जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीला अपघात झाला होता. भरधाव जिपगाडी दिंडीमध्ये घुसल्याने 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सध्या हे सर्व वारकरी या ठिकाणी उपचार घेत आहेत.या जखमी वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विचारपूस केली आहे. विशेष म्हणजे त्याआधी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाशीदेखील संपर्क केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वारकऱ्यांच्या अपघाताची दखल घेऊन चौकशी केल्यानंतर खानापूर-विटा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी मिरज शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर अनिल बाबर यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस करत कोणत्याही प्रकारचे काळजी करू नये, असा धीर मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधत वारकऱ्यांच्या उपचारांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी बाळगू नये, अशा सूचना दिल्या आहेत. (अहो, बस्सा हो! फडणवीसांनी हात धरून शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले, VIDEO) याप्रसंगी खानापूरचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगली शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधिकारी उपस्थित होते. तर जखमी झालेल्या 17 वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची घोषणा आमदार अनिल बाबर यांनी यावेळी केली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News

    पुढील बातम्या