मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदतीचा निर्णय फसवा', अजितदादांनी सांगितल्या त्रुटी

'शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदतीचा निर्णय फसवा', अजितदादांनी सांगितल्या त्रुटी

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये (Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. या घोषणेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 10 ऑगस्ट : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये (Cabinet Meeting) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान होतं त्यासाठी पंचनामे झाले होते. एनडीआरएफच्या (NDRF) मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बॅठकीत घेण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या घोषणेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे. एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मत करण्याचा निर्णय फसवा आणि धुळफेक करणारा आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. एनडीआरएफच्या घटकांमध्ये अनेक घटकांचा समावेश नाही. शेतमजूर, व्यापारी, टपरीधारकांनाही मदत करण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी मांडलं. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झालेले असून दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार, बागायतीला दीड लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, तसंच 3 हेक्टरची मर्यादा शिथील केली गेली पाहिजे, अशा मागण्या अजित पवार यांनी केल्या आहेत. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचे, त्यांना अधिक गाळात घालण्याचे काम केले आहे, अशी टीका त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 3 हेक्टर क्षेत्राची घातलेली मर्यादा अन्यायकारक असून यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ही अट अधिक शिथील करण्याची गरज आहे. अतिवृष्टीकाळात शेतमजूरांचा रोजगार बुडाल्याने त्यांनाही मदत केली पाहिजे. घरातील भांडी, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब 3 हजार 800 रुपये एनडीआरएफचा निकष आहे. तो दुप्पट करुन भागणार नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने भांडी, कपडे व अन्नधान्यासाठी प्रत्येकी 5 हजारांप्रमाणे प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला 15 हजार रुपये दिले होते. पूर्ण पडलेल्या घरांसाठी दीड लाख रुपये तर, अंशत: नुकसानीसाठी सरसकट 50 हजारांची मदत दिली होती, अशी आठवण अजित पवारांनी करून दिली. दुकानदार, टपरीधारक यांच्यासाठी एडीआरएफच्या निकषात कोणतीही मदत नाही. महाविकास आघाडी सरकारने अशा घटकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा कमाल 10 हजार रुपयांची मदत केली होती. यावेळी या घटकांचा कोणताच विचार केलेला दिसत नाही, तो झाला पाहिजे, ही मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
First published:

Tags: Ajit pawar, Eknath Shinde

पुढील बातम्या