मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दोन महिन्यांच्या संघर्षानंतर शिंदे-ठाकरे एकत्र येणार! जागा आणि मुहूर्तही ठरला

दोन महिन्यांच्या संघर्षानंतर शिंदे-ठाकरे एकत्र येणार! जागा आणि मुहूर्तही ठरला

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    मुंबई, 7 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. शिवसेनेच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं बंड आहे. 55 पैकी 40 आमदार तसंच 19 पैकी 12 खासदार यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. आमदारांच्या या पाठिंब्यामुळे तर राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांचा गद्दार म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत. आदित्य ठाकरे तर बंड केलेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन निष्ठा यात्रा काढत आहेत. 20 जूनला विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांना घेऊन पहिले सुरत आणि मग गुवाहाटीला गेले, यानंतर महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं. याच्या दोन महिन्यांनी शिंदे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिराच्या भुमीपूजनाला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 21 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये बालाजी मंदिराच्या भुमीपुजनाचं निमंत्रण मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे कुटुंबालाही दिलं आहे. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 5 ऑगस्टला शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यांची भेट घेतली. समितीचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटले आणि त्यांचा सत्कार केला, तसंच त्यांना भुमीपुजनाच्या कार्यक्रमाचं आमंत्रणही दिलं. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर देवस्थान समितीचे विश्वस्त ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर त्यांची भेट आदित्य ठाकरे यांच्याशी झाली, यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर हे तिरुमाला देवस्थान समितीचे सदस्यही आहेत. 21 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मंदिराच्या भुमीपूजन सोहळ्याला एकाच व्यासपीठावर येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या दोघांनी कार्यक्रमाला हजेरी लावली तर शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र दिसतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या