मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय

BREAKING : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रातील सर्व आमदारांसाठी पहिला मोठा निर्णय

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय फक्त त्यांच्या समर्थक आमदार किंवा भाजप आमदारांसाठी घेतलेला नाहीय, तर सर्वपक्षीय आमदारांसाठी घेतला आहे.

मुंबई, 13 ऑगस्ट : शिवसेनेत फूट पडण्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न बंडखोर आमदारांना विचारला तर त्यांचं पहिलं उत्तर हे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची अनैसर्गिक युती असं आहे. त्यासोबतच त्यांचा दुसरा दावा हा आपल्याला पुरेसा निधी मिळत नव्हता असा आहे. दुसरा दावा हा खूप महत्त्वाचा असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सर्व निधी मिळायचा पण आपल्याला मिळायचा नाही, असा त्यांचा दावा होता. या समस्येवर आपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेदेखील आपली उद्विग्नता व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली होती. पण त्यांनी आपल्या भूमिकेकडे लक्ष दिलं नाही. पण एकनाथ शिंदे यांनी आपल्याला झालेल्या त्रासाची दखल घेत नगरविकास खात्यातून निधी दिला, असं शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचं मत होतं. आमदारांच्या याच भावनांची जाणीव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठेवली आहे. त्यातूनच त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा निर्णय फक्त त्यांच्या समर्थक आमदार किंवा भाजप आमदारांसाठी घेतलेला नाहीय, तर सर्वपक्षीय आमदारांसाठी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमदार विकास निधीसाठी तब्बल 276 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. हा निधी जिल्ह्यातील विकासकामांसाठी वापरला जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वपक्षीय आमदारांना प्रत्येकी 80 लाखांचा विकास निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने सगळे आमदार खूश होण्याची शक्यता आहे. (मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर, तरुणाला प्रचंड मारहाण, नेमकं प्रकरण काय?) उद्धव ठाकरे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत दरम्यान, मुख्य शिवसेनेच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीयत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परीषद आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पत्रही दिले होते. मात्र विधान परीषद सदस्याचा राजीनामा हा विधान परीषद सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ग्राह्य धरला गेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विधान परीषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
First published:

पुढील बातम्या