मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस..., एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर

कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस..., एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर

'जे काही करतो ते खुलेआम करतो. लपूनछपून करत नाही. मोठे मोठे खोके, फ्रीजपेक्षा कंटेनर भरून खोके कुणाकडे जाऊ शकते'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

गुवाहाटी, 27 नोव्हेंबर : 'जे काही करतो ते खुलेआम करतो. लपूनछपून करत नाही. मोठे मोठे खोके, फ्रीजपेक्षा कंटेनर भरून खोके कुणाकडे जाऊ शकते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहिती आहे. एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. त्यांच्या या टीकेला आज गुवाहाटीमध्ये शिदेंनी जशास तसे उत्तर दिले.

'त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार, त्यांची मानसिकता ढळली आहे. जो काही मॉरल आहे, तो तुटलेला आहे. नैराश्यातून ते असं वक्तव्य करत आहे. मला वाटलं होतं काही दिवसांनी नैराश्य येईल. पण ते आधीच आलं आहे. आधीही महाराष्ट्रात नैराश्याचं वातावरण होतं, एक नेगेटिव्ही होती. पण, नवीन सरकार बनवल्यानंतर एक सकारात्मक दृष्य निर्माण झालं आहे. लोकांचेही आमच्याबद्दल चांगले मत आहे. त्यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरले नाही, त्यामुळे ते असं वक्तव्य करत आहे' अशी टीका शिंदेंनी केली.

(गुवाहाटीत 'व्यवस्था' केल्यामुळे शिंदे सरकार खूश, आसाम सरकारला देणार नवी मुंबईत जागा!)

'जे काही करतो ते खुलेआम करतो. लपूनछपून करत नाही. काही लोक हे लपून कामं करतात. लपून केलेली कामं उजेडात येतात, ते लोकांना माहिती पडता, काल केसरकर यांनी या वक्तव्य केलं आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. त्यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे, ते पाहावं. त्यांनी एकच वक्तव्य केलं. फ्रीजमध्ये कुठे खोके घेऊन गेले असं ते म्हणाले. त्याचा मी शोध घेत आहे, त्यावर मी नंतर बोलणार आहे. खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का. मोठे मोठे खोके, फ्रीजपेक्षा कंटेनर भरून खोके कुणाकडे जाऊ शकते, ते कोण पचवू शकतो हे सर्वांना माहिती आहे. एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

(‘काय झाडी, काय डोंगार.’.चा मोह टाळला, 11 जणांनी मारली दांडी, कारणं आली समोर)

'सत्ता संघर्षाचा काळात सलग 11 दिवस गुवाहाटीमध्ये होतो मात्र तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होतं. आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळालं. या केलेल्या मदतीतून उतराई होणं शक्य नसले तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले.

First published:

Tags: Marathi news