देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी दाखवला पुन्हा विश्वास, दिली ही जबाबदारी

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी दाखवला पुन्हा विश्वास, दिली ही जबाबदारी

पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आता कृती आराखडा तयार करावा लागणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 1 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा नवीन जबाबदारी दिलीय. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हा मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकार एक उच्चस्तरीय समिती तयार करणार आहे. देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, कृषीतज्ज्ञ या समितीत असणार आहेत. या महत्त्वाच्या समितीचं समन्वयकपद देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलंय. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी मुख्यमंत्र्यांना आता कृती आराखडा तयार करावा लागणार आहे.

या समितीमध्ये कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी आणि पंचायतराज मंत्री हे या सिमितीचे सदस्य असणार आहेत. तर नीती आयोगाचे रमेश चांद हे या समितीचे सचिव असणार आहेत. देशभरातले शेतकरी, कृषी तज्ज्ञ, हवामान तज्ज्ञ, उद्योजक, फळ प्रक्रिया उद्योगाशी संबंधीत तज्ज्ञ अशा शेतीशी संबंधीत सगळ्या लोकांशी ही समिती चर्चा करणार आहे.

शेतीचा चेहेरा मोहरा बदलण्यासाठी काय करता येईल याचा आराखडा ही समिती तयार करेल. दोन महिन्यात या समितीला आपला अहवाल द्यावा लागणार आहे.

Mission Paani एकाही भारतीयाचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होऊ नये म्हणून...

पाण्याची पातळी कमी होतेय

मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये पाणीबाणी आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्येही तीव्र पाणीटंचाई आहे. मोठ्या धरणांमधले पाणीसाठे आटले आहेत. त्यातच गेली दोन दशकं उपसा झाल्यामुळे भूमिगत पाण्याची पातळीही चांगलीच खालावली आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवरच आम्ही 'मिशन पानी' ही मोहीम सुरू करत आहोत. यामध्ये देशभरातल्या स्थितीचा आढावा आम्ही घेत आहोत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार 19 जूनपर्यंत 43 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. शेती, घरगुती वापर आणि उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा विपरित परिणाम होणार आहे.

ऐन पावसाळ्यात दुष्काळ

महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात तर ऐन पावसाळ्यात दुष्काळासारखीच परिस्थिती आहे. या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात 60 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर पावसाच्या टक्केवारीत 75 ते 89 टक्के घट आहे.मध्य महाराष्ट्र आणि कोकणात फक्त सरासरीपेक्षा एक तृतियांश पाऊस पडला. मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्येही हीच स्थिती आहे. यावर्षी कर्नाटकमध्ये मात्र चांगला पाऊस होतो आहे. महाराष्ट्रात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाच हवामान विभागाचा अंदाज आहे.

...म्हणून मोदींनी केलं बिग बी अमिताभ यांचं कौतुक, शेअर केला हा VIDEO

11 धरणात शून्य टक्के साठा

देशभरातल्या एकूण 91 मोठ्या धरणांपैकी 11 धरणात शून्य टक्के पाणीसाठा उरला आहे. बाकीच्या धरणांमधलाही 80 टक्के पाणीसाठा वापरून संपला आहे. महाराष्ट्रातल्या धरणांना तर या कमी पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे, असं आकडेवारी सांगते.

गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या दक्षिण भारतातल्या तीन प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात जेवढा पाणीसाठा असायला हवा होता तेवढा राहिलेला नाही. गेल्या दशकभराचा आढावा घेतला तर या नद्यांमध्ये जेवढं पाणी असायला हवं होतं त्याच्या निम्मंच उरलं आहे.

सलग काही वर्षं पडलेला दुष्काळ आणि अनियमित येणाऱ्या पावसामुळे भूमिगत पाण्यावर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच 2007 ते 2017 या काळात भूमिगत पाण्याची पातळी 61 टक्क्यांनी घटली आहे. उत्तर भारतातल्या विहिरी यामुळे आटून गेल्या आहेत. भूमिगत पाण्याचा उपसा किती प्रचंड प्रमाणात होतो आहे याचाच हा पुरावा आहे.

First published: July 1, 2019, 9:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading