मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भूमिकेबाबत केला मोठा खुलासा!

मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भूमिकेबाबत केला मोठा खुलासा!

मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, धुळे 23 ऑगस्ट : खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली होती. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत मोठा खुलासा केलाय.

मुख्यमंत्री म्हणाले, मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला असं स्पष्टिकरणही त्यांनी दिला. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे असा खुलासाही त्यांनी केला. सर्व घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ असं सांगत त्यांनी घटक पक्षांना दिलासा दिला.

...तर दिल्लीत जाण्यास तयार

राज्यात देवेंद्र आणि दिल्लीत नरेंद्र अशी घोषणा राज्यात कायम दिली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलंय असं मानलं जातं. राज्या ज्या मोजक्या मुख्यमंत्र्यांना सलग पाच वर्ष पूर्ण करायला मिळाली अशा मोजक्या नेत्यांचामध्ये त्यांचा समावेश होतो. महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज गुगली टाकत सगळ्यांनाच धक्का दिला. मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असं त्यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या Exclusiveमुलाखतीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय.

उदयनराजे पक्षात आले तर आनंदच

मुख्यमंत्री म्हणाले, आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना प्रतिसाद नाही उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु.

ABVP च्या कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या पोस्टरला फासले काळे, 'त्या' घटने

पूरग्रस्त भागातली जनता पाठिशी

पूरग्रस्त भागासाठी मोठा निधी देण्यात आलाय.अमित शाहांशी पूरग्रस्त भागाबद्दल चर्चा केली. पूरग्रस्त भागातील राजकारणाची चर्चा उथळ आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा इथली  भागातील जनता आमच्या पाठीशी आहे.पूराचा विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही  असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार

सहकार नाही तर स्वाहाकार झालाय. या प्रकरणाबद्दल बराच काळ चौकशी सुरु होती. कोर्टाच्या निकालानुसार आम्ही कारवाई करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज ठाकरे

राज ठाकरे यांची ईडीची चौकशी राजकीयदृष्ट्या नाहीये. राज ठाकरे सगळीकडे हरलेत. जे राजकीयदृष्या हरलेत त्यांची अशी मुद्दाम चौकशी करुन काय फायदा? आपल्यावर काही आलं तर ते राजकीय असं म्हणतात.

लोकसभेत राज ठाकरे यांच्या भाषणानं कोणताही परिणाम झाला नाही आता काय होणार? राज ठाकरेंनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेत.

दिवाळखोरीत गेलेल्या 'जेट'च्या नरेश गोयल यांच्या घर-ऑफिसवर EDचे छापे

राणेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा

राज ठाकरे यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं मत त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. माझी आणि शरद पवार यांनी कामाची पद्धत वेगळी.  मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनास बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्या सोबत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 23, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading