सांगलीतील भाजपच्या मेळाव्यासाठी पैसे वाटून गर्दी, व्हिडिओ व्हायरल

सांगलीतील भाजपच्या मेळाव्यासाठी पैसे वाटून गर्दी, व्हिडिओ व्हायरल

इस्लामपूरमध्ये रविवारी झालेल्या भाजपच्या शेतकरी मेळावासाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भाजपने पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

  • Share this:

30 मे : इस्लामपूरमध्ये रविवारी झालेल्या भाजपच्या शेतकरी मेळावासाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपने पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, भाजपचा शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टीच्या वर टीका करण्यात आली. राजकीय वातावरण तापवणाऱ्या या सभेसाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मेळाव्यासाठी आलेल्या लोकांना मेळावा संपल्यावर याद्यामध्ये नोंद करून पैसे वाटप केल्याचं चित्रण कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे. भाजपने पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसंच माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर 'कट्टप्पा' म्हणून टीका करणारे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच खरे कट्टप्पा आहेत, त्यांनी तर खासदार राजू शेट्टींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

तर पैसे वाटून लोक गोळा करण्याची संस्कृती राष्ट्रवादीचीच आहे, पैसे वाटपाचा भाजपावरील आरोप बोगस आहे, असा पलटवार भाजपने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2017 09:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading