भाजप-सेना युती तुटली? देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले 21 मोठे मुद्दे

भाजप-सेना युती तुटली? देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतले 21 मोठे मुद्दे

युती तुटली, असं मी म्हणणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले असले, तरी शिवसेनेच्या ताठर भूमिकेविषयी त्यांनी सडेतोड उत्तरं दिली. अडीच वर्षांचा शब्द दिलाच नव्हता असं म्हणणाऱ्या फडणवीसांच्या बोलण्यातले हे 21 मोठे ठरू शकतात मोठे...

 • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यापालांकडे सोपवला. त्यानंतर पत्रकारांनी बोलताना त्यांनी सरकारस्थापनेच्या तिढ्याबद्दल सविस्तर मतं मांडली. शिवसेनेचे मुद्दे खोडून काढत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिवसेनेशी चर्चा न होण्याला 100 टक्के सेनाच जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तरी युती तुटली, असं मी म्हणणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यपालांच्या आदेशानंतर आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम बघणार आहेत. कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नसेल.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतले 21 मोठे मुद्दे

 • 1. माझ्यासमोर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल निर्णय झालेला नव्हता. किंबहुना या विषयावरूनच बोलणी फिसकटली होती. ती थांबवली गेली. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली, त्या वेळी हा विषय नव्हता.
 • 2. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षांची चर्चा झाली असेल तर मला माहीत नाही. पण मी राष्ट्रीय अध्यक्षांना आणि गडकरींनाही याविषयी विचारलं. भाजपने असा कुठलाही शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता.
 • 3. कुणाला खोटं ठरवण्यासाठी भूमिका मांडत नाही.
 • 4. माननीय उद्धव ठाकरेंना मी स्वतः फोन केले. ते त्यांनी घेतले नाहीत.
 • 5. आमची दारं चर्चेसाठी कायम खुली होती, शिवसेनेनं चर्चेची संधी दिली नाही.

  LIVE : फडणवीसांनंतर आता उद्धव ठाकरे बोलणार; अडीच वर्षांच्या शब्दाचं खरं खोटं 6 वाजता उलगडणार?

 • 6. भाजपबरोबर चर्चा करणार नाही, तर काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच चर्चा करणार असं शिवसेनेचं धोरण निकालानंतर लगेचच दिसलं.
 • 7. निवडणूक निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, सरकार बनवण्याचे आमचे मार्ग खुले आहेत. हा आमच्यासाठी धक्का होता.
 • 8. चर्चेतून प्रश्न, गैरसमज दूर करू शकलो असतो. पण चर्चाच करणार नाही, ही शिवसेनेनं भूमिका घेतली.
 • 9. अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या असतील, पण आमचा स्ट्राईक रेट चांगलाच. निवडणुकीच्या यशाचा स्ट्राइक रेट 70 टक्के राहिला आहे.
 • 10. आमच्याबरोबर केंद्रात सरकारमध्ये राहायचं, राज्यात सरकारमध्ये राहायचं. पण भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर खालच्या दर्जाची टीका करायची हे धोरण योग्य नाही.
 • VIDEO : संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार, दिलं 'हे' उत्तर
 • 11. नरेंद्र मोदींवर शिवसेनेनं टीका केली, हे योग्य नाही.
 • 12. आम्हाला उत्तरं देता येत नाहीत, असं समजू नये. आमच्याकडे उत्तरं द्यायची क्षमता आहे, पण त्यांच्या भाषेत उत्तरं देणं आम्हाला शोभणार नाही. आम्ही जोडणारी लोकं आहोत. तोडणारी लोकं नाही.
 • 13. पहिल्या दिवसापासून काही लोकांनी तोडण्यासाठी काम केलं.
 • 14. विरोधी पक्षांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण ज्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करायची म्हणून निवडणूक लढवायची त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही.
 • 15. आमचा चर्चा करण्याचा प्रयत्न सेनेनं फेटाळून लावला. माझा फोनही उद्धव ठाकरेंनी घेतला नाही. त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करायला त्यांना वेळ होता.
 • 16. भाजपशी चर्चा करायला वेळ नाही, पण काँग्रेस - राष्ट्रवादीशी चर्चा करायला दिवसातून तीन तीन वेळा आहेत.
 • राऊतांच्या म्हणण्यानं काय होतंय? असं बोलून सरकार बनत नसतं.
 • आम्हाला अजूनही युतीची सत्ता यावी, असंच वाटतंय. कारण तोच जनादेश आहे.
 • कुठलंही फोडाफोडीचं राजकारण आम्ही करणार नाही. मी शब्द देतो.
 • राज्यापालांच्या आदेशावरून वैकल्पिक व्यवस्था होईपर्यंत मी मुख्यमंत्री म्हणून कारभार बघणार.
 • बाळासाहेब आमच्यासाठी कायम आदरणीय. त्यांच्याबद्दल कधी अवाक्षरही काढणार नाही.
 • जनतेला सरकार आम्ही देऊ शकलो नाही, याची खंत.
 • जनादेश नाकारण्याचं धोरण चुकीचं

  ----------------------------------------

  VIDEO : मग कशाला सरकार चालवायचं? फडणवीसांचा सेनेवर गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 06:12 PM IST

ताज्या बातम्या