रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तरी काँग्रेस विरोधी पक्षातच राहणार - मुख्यमंत्री

रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तरी काँग्रेस विरोधी पक्षातच राहणार - मुख्यमंत्री

मित्र पक्षांशी माझी चर्चा झालेली आहे ते नाराज नाहीत. लोकसभा आणि विधानसभेसाठी मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी मुंबई 24 फेब्रुवारी :  सोमवारपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षांवर हल्लाबोल केला. रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तरीही काँग्रेसपक्ष हा विरोधी बाकांवरच बसणार आहे असा टोला त्यांनी लगावला. राज्यातले भाजपचे मित्रपक्ष नाराज नाहीत त्यांच्याशी चर्चा झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

शिवसेना कायम आमच्या सोबत होती आणि आताही आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत चिंता करू नका. सर्व व्यवस्थित होणार आहे.

मित्र पक्षांशी माझी चर्चा झालेली आहे ते नाराज नाहीत. लोकसभा आणि विधानसभेसाठी मित्र पक्ष आमच्या सोबत आहेत.

आम्ही तर युती झाली मात्र विरोधी पक्षांनी तर अजु चर्चाच सुरू आहे.

आम्ही नगरमध्ये उमेदवार देणार आहोत. त्यामुळं तिथे आमचाच विजय होईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत कोरडवाहू शेतीसाठी निकष काही बदल करण्याचा आमचा विचार आहे.

चारा छावण्या दिल्या नाहीत ही पोटदुखी नाहीये पण तिथल्या पालकमंत्र्यांना लक्ष द्यायला सांगितलंय ही अडचण आहे.

गेल्या सरकारने 15 वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना 2000 कोटींची नुकसान भरपाई दिली.

आम्ही चार वर्षांत 2 कोटी 26 लाख शेतकऱ्यांना 13, 135 कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे.

82 लाख शेतक-यांना मदत करायची आहे त्यापैकी 42 लाख शेतक-यांच्या खात्यात रक्कम दिली आहे आणि राहिलेल्या 40 लाखांना निधी दिला जाणार आहे.

First published: February 24, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading