विवेक कुलकर्णी, मुंबई 24 फेब्रुवारी : युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलयावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत होते. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरे समजा असे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा चेहरा पाहण्यासारखा होता.
युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याबाबत जर रामदास कदम आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी काही वक्तव्य केले आणि त्यात जर काही तफावत वाटत असेल तर माझे आणि उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य अंतिम आहे हे मानावे असे मुख्यमंत्र्यांनी न्यूज १८ लोकमतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटप असा कोणताही फॉर्म्युला नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर संतापलेल्या रामदास कदम यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही जर अट मान्य नसेल तर युती तोडा दिल्यानंतर पून्हा एकदा शिवसेना-भाजपा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी वरून आमने सामने आल्याचे पहायला मिळाले होते. मात्र या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकलाय.
VIDEO : युतीबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती - मुख्यमंत्री