मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर सुरू झालं आणि अधिकारी खाली पडले

मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर सुरू झालं आणि अधिकारी खाली पडले

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर ते ठाणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बिमणवार यांना सूचना देत होते आणि त्याचवेळी पायलटनं हेलिकॉप्टर सुरू केलं

  • Share this:

08 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भिंवडी दौऱ्यात अधिकाऱ्यांची कसरत कॅमेऱ्यात कैद झाली. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर ते ठाणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बिमणवार यांना सूचना देत होते आणि त्याचवेळी पायलटनं हेलिकॉप्टर सुरू केलं. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या जवळ उभे असलेले राजशिष्टाचार विभागाच्या अधिकाऱ्यांची पळापळ झाली. या गडबडीत बिमनवारही पडले. ही घटना मोबाईलमध्ये कैद झालीये.

मुंबई - नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी बायपासवरील माणकोली नाका येथे `एमएमआरडीए'ने उभारलेल्या उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम उरकल्या नंतर दिवा येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री यांच्याशी ठाणे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक बिमणवार चर्चा करताना अचानक हेलिकॅप्टर सुरू झाल्याने घाबरलेले मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक बिमणवार यांनी पळ काढताना यांचा तोल गेल्याने ते खाली पडले.

मात्र बिमणवार आणि मुख्यमंत्र्यांचा ड्रेस एकच असल्याने मुख्यमंत्री पडलेली काय असा कांगावा येथील पाहणाऱ्या नागरिकांनी केला होता. मात्र अशी घटना घडणे म्हणजे मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागत असून त्यांच्याकडे येणाऱ्या अधिकारीवर्ग, राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधीही धोक्यात येऊ शकतात.

First published: April 8, 2017, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading