शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत - मुख्यमंत्री

शरद पवारांचं मानसिक संतुलन ढळलं आहे. त्यामुळेच ते हातवारे करत आहेत. खरा पैलवान कोण हे आता जनताच दाखवून देईल.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 03:10 PM IST

शरद पवार राजकारणातले 'नटरंग', त्यामुळेच ते 'हातवारे' करताहेत - मुख्यमंत्री

जळगाव 13 ऑक्टोंबर : राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचार चांगलाच तापलाय. आज रविवार असल्याने सगळ्याच पक्षांच्या बड्या नेत्यांनी सभांचा धुराळा उडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळवगाव मध्ये पहिली सभा घेत काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. तर याच सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर सडकून टीका केलीय. आम्ही राजकारणातले नटरंग नाहीत. तेच राजकारणातले नटरंग आहेत. त्यामुळेच ते तसे हातवारे करत टीका करताहेत. आमची ती संस्कृती नाही आणि आम्ही त्या पातळीवर खाली उतरणार नाही असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री महोदय, आणखी एका शेतकऱ्याची कर्जामुळे आत्महत्या; 2 मुलं वाऱ्यावर!

शनिवारी बार्शीत झालेल्या प्रचारसभेत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. लढाई ही फक्त पैलवानांमध्ये होते इतरांमध्ये नाही अशी टीका शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर 'हातवारे' करत केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी हा पलटवार केलाय. ते पुढे म्हणाले, शरद पवारांचं मानसिक संतुलन ढळलं आहे. त्यामुळेच ते हातवारे करत आहेत. खरा पैलवान कोण हे आता जनताच दाखवून देईल. ते सांगण्याची गरज नाही. कुस्तीसाठी कुणी पैलवानच नाही. आणि मैदानही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते त्याला पवारांनी उत्तर दिलं होतं.

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा LIVE VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Loading...

मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाला मत द्या. जगभरात भारताचा गौरव होत आहे, 4 महिन्यांपूर्वी दिलेल्या मताधिक्याबद्दल आभार. संपूर्ण जगभरात भारताच्या लोकशाहीचा गौरव. जनादेशामुळे भारताचा आवाज जगभरात ओळखला जातो. स्त्रीशक्तीचा जागर जगाने मानला.  70 वर्षानंतर काश्मीरमधील नागरिकांना स्वातंत्र्य.  सीमेपलीकडे होणारा दहशवाद संपवला. मोदींकडून कलम 370 आणि काश्मीरचा उल्लेख. काश्मीर भारताचं मस्तक आहे. गेली 5 वर्ष जनतेचा युतीवर विश्वास आहे. कलम 370 वर विरोधकांची भूमिका संशयास्पद. हिंमत असेल तर घोषणापत्रात कलम 370बद्दल नमुद करा, विरोधकांना आव्हन. मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला.  तीन तलाक कायदा रद्द केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...