राज ठाकरेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री भलतेच आक्रमक, म्हणाले...!

राज ठाकरेंबद्दल बोलताना मुख्यमंत्री भलतेच आक्रमक, म्हणाले...!

'या निवडणूकीत बारामतीकरांनी बारामतीत 32 किलोमीटर परिसरात 2 दिवसात 7 सभा घेतल्या. त्या कमी पडल्या की काय म्हणून आता साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं.'

  • Share this:

बाळासाहेब काळे, प्रतिनिधी

बारामती, 18 एप्रिल : बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं सासवड इथं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्य़ांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही चांगलाच नेम धरला.

'या निवडणूकीत बारामतीकरांनी बारामतीत 32 किलोमीटर परिसरात 2 दिवसात 7 सभा घेतल्या. त्या कमी पडल्या की काय म्हणून आता साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलं.' असं म्हणत त्यांनी 'पूर्वी लोक सायकल भाड्याने घेत होते, गाडी भाड्याने घेत होते, या निवडणुकीत मात्र शरद पवारांनी इंजिन भाड्याने घेतलं आहे. ते ही असं इंजिन भाड्याने घेतले जे म्युझियममधील कोळशाचं इंजिन आहे. अशाने त्यांची बारामतीची गाडी पुढे सरकणार नाही' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

पुरंदर तालुक्यातील पाणी प्रश्नाबाबत गुंजवणी प्रकल्पाला खूप महत्व आहे. पुरंदरचं राजकारण या प्रकल्पाभोवतीच फिरत असल्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोच धागा पकडून भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. गुंजवणी प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी चुकीचा शब्द वापरला. पण आपली सॉरी म्हणत त्यांनी लगेचच आपली चूक सुधारली.

हेही वाचा : महाराष्ट्रात आजही धडाडणार दिग्गजांची तोफ, कुणाची किती वाजता सभा?

..तर काँग्रेस नेत्याला रॉकेटला बांधून बालाकोटमध्ये सोडलं असतं, फडणवीसांची खोचक टीका

लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी उदगीर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'बालाकोट हल्ल्याबाबत काँग्रेसने पुरावे मागितले, हे जर आधीच माहीत असतं तर त्यांच्या एका नेत्याला विमानातल्या रॉकेटला बांधून सोडलं असतं आणि पुरावा दिला असता', अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.

पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा..

मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाकिस्तानचा जोरदार समाचार घेतला. पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा देश आहे.  पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात सीआरपीएफचे ४०  जवान शहीद झाले. आपल्या देशाची मोठी हानी झाली. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला परवानगी दिली. लष्कराने पहाटे हल्ला करून बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला.

लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांतच लढत होत आहे. अंतिम टप्प्यात काँग्रेसने थोडा जोर वाढवल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यातील मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला अनुसूचित जातीमधील तरुणांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून काँग्रेसची चिंता चांगलीच वाढली आहे.

हीच 'ती' सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेली AUDIO क्लिप

First published: April 18, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading