'नाणार' पुन्हा येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर!

'नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत होतं मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. आता लोकांची इच्छा असल्यास त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार.'

News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2019 10:02 PM IST

'नाणार' पुन्हा येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, उद्धव ठाकरेंना दिलं उत्तर!

दिनेश केळुस्कर, राजापूर 17 सप्टेंबर : राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार उत्तर दिल्याचं बोललंत जातंय. नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत होतं मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. आता लोकांची इच्छा असल्यास त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य हे शिवसेनेला राजकीय उत्तर असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी रात्री राजापूरला आली होती. त्यावेळी नाणार समर्थकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

आरे वाचवण्यासाठी काँग्रेसचे माजी पर्यावरणमंत्री शिवसेनेच्या साथीला

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नाणार ही ग्रीन रिफायनरी आहे. ही झाली असती तर इथल्या 1 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. विकास झाला असता. मात्र विरोधामुळे हा निर्णय थांबवावा लागला. आज मी कुठली घोषणा करत नाही. मात्र  इथल्या लोकांना पुन्हा एकदा चर्चेला बोलावतो असं आश्वासन त्यांनी दिलं.

मुंबईतल्या आरे इथं होणार असलेल्या मेट्रो कारशेडबाबत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्पही नाणारसारखाच जाणार असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचं या प्रकल्पाला समर्थन आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेत नाणारचं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेत यावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

Loading...

'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

मुंबईत(Mumbai) आज 'सावरकर इकोज फ्राँम ए फरगाँटन पास्ट' ('Savarkar: Echoes from a forgotten past') या विक्रम संपथ (Vikram Sampath) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकी (Loksabha Election)पासूनच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी पर्यंत सावरकर(Vir Savarkar) यांच्या संदर्भात विरोधक ते सत्ताधारी यांच्यात अनेक वाद झालेत. या झालेल्या वादांवर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसने(Congress) किती ही द्वेष केला तरी सावरकर संपणार नाहीत असं त्यांनी सांगितलं.

SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

उद्धव ठाकरे म्हणाले, आज मराठवाडा मुक्ती दिन. संभाजी नगरचा तिथला खासदार या कार्यक्रमाला आला नाही. तुझा धर्म कुठला म्हणून तू निवडून आला का...? आज आमचा खासदार सावरकरांच्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित आहे. पण तिथला खासदार मराठवाडा मुक्ती दिनाला उपस्थित रहात नाही. तुम्ही मुसलमान म्हणून निवडून आलेला नाहीत असंही त्यांनी इम्जियाज जलील यांना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...