मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राईनपाडा हत्या प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

राईनपाडा हत्या प्रकरण, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं हत्या झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं हत्या झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं हत्या झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

  ता,2 जुलै : धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा इथं हत्या झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका वाटल्यास पोलीसांना माहिती द्या मात्र कायदा हातात घेऊ नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

  नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वणी सप्तश्रृंगी गडावरच्या फ्युनिक्युलर ट्रॉलीचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

  महाराष्ट्रात अफवेचं भूत, मालेगावात चौघांना स्थानिकांकडून बेदम मारहाण

  काय घडलं राईनपाड्यात?

  धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून राईनपाडा इथं जमावाने 5 जणांची निघृण हत्या केली. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी 10 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

  राईनपाडा आणि परिसर हा आदीवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. आज राईनपाडा इथं आठवडी बाजार होता त्यामुळं लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं आफवेची चर्चा जास्त झाली.

  ...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता

  अफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका!

  संशयावरून काही लोकांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. संत्पत नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.

  मृतांची नावं

  1) भारत शंकर भोसले

  2) दादाराव शंकर भोसले

  3) भारत शंकर मालवे

  4) अप्पा श्रीमंत भोसले

  5) राजू भोसले

  First published:

  Tags: Rumourss, धुळे, पाच लाख, मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस