घोडा, गाढव आणि हत्ती, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांमध्ये रंगली जुलबंदी!

घोडा, गाढव आणि हत्ती, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांमध्ये रंगली जुलबंदी!

'मी गेल्या काळात पाहिलेले देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. जे काही पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प सुरु आहेत त्यांचे 50 टक्के महाराष्ट्रात सुरू आहेत.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 08 फेब्रुवारी : कार्यक्रम होता अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्याचा. स्थळ मुंबईतलं स्टॉक एक्सचेंजचं सभागृह. अर्थमंत्री पियुष गोयल हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पण त्यांना यायला उशीर झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ला लढवला. त्यानंतर दोनही नेत्यांची जुगलबंदी रंगली.

या कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी विलेपार्ले ते चर्चगेटपर्यंतचा प्रवास रेल्वेमार्गाने केला. रेल्वेमंत्र्यांसाठी असलेल्या विशेष बोगीतून रेल्वेमंत्री चर्चगेटला पोहचले. या प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. दिल्लीहून त्यांचं विमान उशीरा मुंबईत पोहोचलं. त्यानंतर त्यांना बॉंम्बे स्टॉक एक्सचेंजच्या कार्यक्रमात जायचं असल्याने त्यांनी ट्राफिक टाळण्यासाठी रेल्वेनेच येणं पसंत केलं.

अशी रंगली जुगलबंदी!

मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच पियुष गोयल यांचं आगमन झालं. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, बरं झालं तुम्ही आलात मी नाईट वॉचमन म्हणून बॅटिंग करतोय. एखादी गोष्ट हॉर्सेस माऊथ कडून ऐकावी. अर्थात तुम्ही घोडा नाही आहात. त्यावर गोयल म्हणाले, बरं झालं मला तुम्ही गाढव नाही म्हणालात, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, लोकं मला तर हत्ती म्हणतात. या जुगलबंदीवर सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मी आत्ता नाईट वॉचमन म्हणून बोलतोय, पियुष गोयल येतील तोपर्यंत मला बोलायचं आहे. केंद्र सरकारनं काही कठोर निर्णय घेतले पण त्याने देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली गेली आहे.

प्रत्येक सरकारनं गरिबी हटावची भाषा केली पण त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. निव्वळ त्या योजनांवर खर्च केला म्हणून तो निर्णय योग्य ठरत नाही.

पुढील काळात भारताचं सरासरी वय २७ असेल. भारताकडे मोठं मनुष्यबळ असेल. त्याचा जर योग्य वापर केला तर देशाला आणि जगाला मोठा फायदा होऊ शकतो.

२०२० ते २०३५ पर्यंत भारतात तरुणांची संख्या जास्त असेल आणि त्यानंतर अशी संख्या अफ्रिकेत असेल. जगात कुठेही पाहा विकास करायचा असेल तर तो पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करूनच तो होत असतो.

शेतीतील स्थायी विकास हाच देशाला पुढे नेईल याचाच विचार करुन केंद्र सरकार काम करत आहे. म्हणजे गेल्या 50-60 वर्षात जेवढं काम झालं नाही त्यापेक्षा जास्त काम गेल्या 4 वर्षात झालं.

पियुष गोयल काय म्हणाले?

मी गेल्या काळात पाहिलेले देवेंद्र फडणवीस हे सर्वोत्तम मुख्यमंत्री आहेत. जे काही पायाभूत सोयीसुविधांचे प्रकल्प सुरु आहेत त्यांचे 50 टक्के महाराष्ट्रात सुरू आहेत. बजेट कामामुळे दिल्लीत अडकलो होतो, नंतर माझं विमान उशीरा झालं आणि मग मला लोकलचा वापर करत आलो.

मला बुधवारी कळालं  आणि शुक्रवारी मी बजेट सादर केलं. मला यात पंतप्रधानांनी अक्षरश: रस्ता दाखवला. अरुण जेटली हे तर उपचाराकरता जाण्याच्या 2 तास आधीपर्यंत बजेटवर काम करत होते. मी त्या दिवसांमध्ये रात्री तीन-साडेतीन वाजेपर्यंत झोपत नव्हतो. मला तर जेटलींनी याबद्दल रागावले सुद्धा

देशात १४.५ कोटी अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यांना दोन्ही वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. त्यांना छोटी रक्कम पण मदत करते. आम्ही त्यांना मदत करतो म्हणजे खूप करतो असं नाही पण त्यांना मदत करतो म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करतो.

अनेक जण आमच्यावर टीका करतात की जीएसटीमध्ये आम्ही सतत बदल करतो पण तुम्ही जे बदल सांगतायंत ते आम्ही करायचे की आडमुठेपणा दाखवायचा ?

महाराष्ट्र बॅंक प्रकरण

पुण्यातल्या एका बॅंकरवर चुकीची कारवाई करण्यात आली होती. यावर अरुण जेटली, मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली आणि लक्षात आलं ते (मराठे) निर्दोष आहेत. म्हणून मग त्यांचे  नाव आरोपपत्रात टाकण्यात आलं नाही.

VIDEO : ...नाहीतर आज तुमच्यात नसतो, अजितदादांनी सांगितला थरारक किस्सा

First published: February 8, 2019, 9:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading