मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार आणि मुख्यमंत्री बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार!

शरद पवार आणि मुख्यमंत्री बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार!

बारामती लोकसभा मतदार संघातल्या 11 हजार 737 ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवांचं वाटप या कार्यक्रमात होणार आहे.

जितेंद्र जाधव, बारामती 11 फेब्रुवारी : लोकसभेच्या निवडणुकीत बारामती जिंकण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. राष्ट्रवादीकडून या विधानाची खिल्ली उडविण्यात आली होती. तर मुख्यमंत्र्यांना हे बोलणं शोभतं का? असा टोला अजित पवारांनी हाणला होता. आता मुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येत आहेत. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सहाय्य मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती लोकसभा मतदारसंघातील 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेंतर्गत कृत्रिम तसेच सहाय्यभूत उपकरणांचे थेट वितरण करण्याचा हा कार्यक्रम आहे. शुक्रवारी 15 फेब्रुवारी हा कार्यक्रम होणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघातल्या 11 हजार 737 ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयवांचं वाटप या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थेवरचंद गेलहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरिश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि शरद पवार नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.
First published:

Tags: Ajit pawar, Baramati, Cm devendra Fadanvis, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बारामती

पुढील बातम्या