CM फडणवीस अखेर पत्रकार परिषद घेणार, त्याआधीच संजय राऊतांनी केली थेट मागणी

CM फडणवीस अखेर पत्रकार परिषद घेणार, त्याआधीच संजय राऊतांनी केली थेट मागणी

देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : सत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं, असा दावा विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य करताना दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आपलं वक्तव्य मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपकडून ड्राफ्टही तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे.

भाजपच्या ड्राफ्टवर काय म्हणाले संजय राऊत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य मागे घेणार असल्याच्या चर्चेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला कोणताही ड्राफ्ट नको तर थेट मुख्यमंत्रिपदाचं पत्र द्या,' असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा राजकीय पेच नक्की कसा दूर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात उलथापालथ होणार?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर चर्चा करण्यासाठी वकील माजीद मेमन हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक इथं पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेचा दावा न केल्यास शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होणार का, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार यांनी 2014 मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण हा पाठिंबा दिल्याचं स्पष्टीकरण तेव्हा शरद पवार यांनी दिलं होतं. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही राज्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकाड गाठता आलेला नाही. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा राजकीय डावपेच टाकणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 03:53 PM IST

ताज्या बातम्या