मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना 3 वेळा फोन, मातोश्रीवरून मिळालं असं उत्तर!

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना 3 वेळा फोन, मातोश्रीवरून मिळालं असं उत्तर!

राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : महाराष्ट्रात भाजप-सेनेतील सत्तेचा संघर्ष अखेरच्या क्षणापर्यंत कायम आहे. त्यांच्यात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेच्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य केलं आहे. 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून राजकारण हा राज्यातील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका भाजपवर संजय राऊत यांनी केली आहे. तसंच मध्यस्थीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनाही फटकारलं आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर भेट घेण्यास येण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त आज तकने दिले आहे. गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तीनवेळा फोन केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एकदाही त्यांच्याशी चर्चा केली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ज्यावेळी कॉल केला तेव्हा उद्धव ठाकरे दुसऱ्या कॉलवर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉल केला त्यावेळी उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्याचं उत्तर मिळालं. यानंतरही फडणवीस यांनी तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांना कॉल केला. यावर पुन्हा उद्धव ठाकरे स्वत: फोन करतील असं उत्तर देण्यात आलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चेसाठी दोघांचा मित्र असलेल्या एका उद्योजकाने प्रयत्न केले. पण त्यांना राजकारणावर चर्चा करू नये असं सांगण्यात आलं.

'शिवसेनेला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित आणि तथाकथित मध्यस्थांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कुणीही मध्यस्थी करू नये. हा विषय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला आहे, यात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही,' असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे हे मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न घेताच संभाजी भिडे यांना मातोश्रीवरून काढता पाय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे यांनी उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली पण ते मातोश्रीवर न परतल्यामुळे संभाजी भिडे तिथून निघून गेले.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 01:01 PM IST

ताज्या बातम्या