• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पत्रकाराच्या प्रश्नावर पवार भडकले, मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पत्रकाराच्या प्रश्नावर पवार भडकले, मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांनी आक्रमक होत नातं आणि राजकारण याचा संबंध जोडल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती.

 • Share this:
  नांदेड, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषद भडकल्याचं काल (शुक्रवारी)पाहायला मिळालं. नेत्यांनंतर आता तुमचे नातेवाईकही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, या आशयाचा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांनी आक्रमक होत नातं आणि राजकारण याचा संबंध जोडल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार रागवले, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'पवारांची राष्ट्रवादी ही फक्त महाराष्ट्रापुरती आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रापुरती आणि त्यातही काही जिल्ह्यापुरती आहे.' दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात फारसे कधी चिडत नाही की रागावत नाहीत. ते कायम आपल्या संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. कुठल्याही कठीण प्रश्नावर ते अगदी संयमाने कायम उत्तरं देतात. आणि टीका करतानाही त्यांचा तोल कधी जात नाही. मात्र काल श्रीरामपूर इथं एका कार्यक्रमासाठी आलेले पवार पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर चांगलेच भडकले आणि त्यांनी त्या पत्रकाराला त्या प्रश्नाबद्दल माफीचीही मागणी केली. ज्या प्रमाणावर नेते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जाताहेत त्याच संदर्भातला एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. राष्ट्रवादीमधून सध्या अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादीला लागलेली ही गळती काही थांबायचं नाव घेत नाहीये. सध्या अनेक दिग्गजांची नावंही चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे बडे नेते जिथे जातील तिथे त्यांना त्याबाबतचा प्रश्न हमखास विचारण्यात येतोच. श्रीरामपूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेद एका पत्रकाराने पवारांना तुमच्या जवळचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत, तुमचे अनेक नातेवाईक असलेले नेतेही पक्ष सोडत आहेत असा प्रश्न विचारला. नातेवाईकांचा प्रश्न शरद पवारांना आवडला नाही. त्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. 'इथे नात्याचा तुम्हा प्रश्न का विचारला असा प्रश्न त्यांनी केला. इथं नात्याचा प्रश्नच येत नाही. हा तुमचा प्रश्न हा औचित्याचा भंग करणारा आहे. याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे,' असं त्यांनी सुनावल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल
  Published by:Akshay Shitole
  First published: