सरकारनं आश्वासन पूर्ण केलं, ओबीसी कोट्याला धक्का नाही - मुख्यमंत्री

सरकारनं आश्वासन पूर्ण केलं, ओबीसी कोट्याला धक्का नाही - मुख्यमंत्री

मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्याला धक्का लागणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारनं जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. आम्ही लोकांना बांधील आहोत अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ज्या लोकांनी, पक्षांनी या प्रश्नावर पाठिंबा दिला त्या सर्वांचं हे श्रेय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या विषयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, आरक्षणाचा निर्णय घेताना सरकारला काळजी घ्यावी लागली. हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टीकावं यासाठी ज्या काही तरतूदी करणं आवश्यक होतं त्या सर्व तरतूदी सरकारनं केल्या आहेत आणि यापुढे हे आरक्षण टिकावं यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. असं आश्वासनही त्यांनी दिलं.

मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्याला धक्का लागणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. अशा प्रकारचं कलमच या विधेयकात टाकण्यात आल्यामुळं ओबीसींचा कोट्याला धक्का लागणार नाही. काही लोक मुद्दाम या विषयावर फुट पाडण्याचा प्रयत्न करताहेत अशी टीकाही त्यांनी केली.

त्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे नाहीत.

मराठा आंदोलनादरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घेण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला आहे. याचा निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या समितीने 200 जणांवरचे गुन्हे मागे घेतला.  300 जणांवरचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होईल. तर सीसीटीव्ही फुटेज असलेल्या 46 जणांवरचे गुन्हे मात्र मागे घेण्यात येणार नाहीत असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

#MustWatch: तुम्ही पाहिलेच पाहिजेत असे धक्कादायक 5 व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading