दुष्काळात कुणाला किती मदत? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

दुष्काळात कुणाला किती मदत? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून ठिकठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 2 मे : भीषण दुष्काळामुळे महाराष्ट्रा होरपळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून ठिकठिकाणी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

दुष्काळातील उपाययोजना म्हणून 12 हजार 116 गावांमधे 4774 टँकर्स देण्यात आले आहेत. तसंच 1264 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. यात 7 लाख 44 हजार मोठी जनावरं आणि जवळपास 1 लाख लहान जनावरं, म्हणजे जवळपास साडेआठ लाख जनावरं आहेत. मोठ्या जनावरांना 90 रुपये आणि लहान जनावरांना 45 रुपये दर देण्यात आला आहे.

चाऱ्याची उपलब्धता 58 हजार हेक्टर जमिनीवर आहे. दुष्काळाकरता जी थेट मदत करतो ती 82 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळाली आहे. एकूण 4412 कोटी रुपये त्यात देण्यात आले आहेत. 3200 कोटी रुपये विम्याचे देण्यात येणार आहेत. त्यातले 1100 कोटी रुपये देण्यात आले आहेत. व्हेरीफिकेशन करण्यासाठी थांबलो आहोत. बाकी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पैसे देण्यात आले आहेत.

पाण्याचे टँकर्स औरंगाबाद विभागात पाहायला मिळतायत. जायकवाडीत मृतसाठा वापरला जातोय. पण तिथे मृतसाठा भरपूर आहे त्यामुळे ते पाणी आत्ता वापरता येईल, अशी परिस्थिती आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही. आम्ही आज निर्देश दिले आहेत की पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांचा आढावा घ्यावा. त्यांनी चारा छावण्यांचा आढावा घ्यावा, पाण्याच्या टँकर्सना जीपीएस लावण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याचीही पडताळणी करावी.

VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

First published: May 2, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading