पुरामुळे गंभीर स्थिती, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

पुरामुळे गंभीर स्थिती, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये हवाई पाहणी करत या स्थितीचा आढावा घेतला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 8 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये हवाई पाहणी करत या स्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

'सांगलीतील स्थिती अत्यंत गंभीर आहे. पण लोकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजून काही टीम आम्ही सांगलीला पाठवणार आहोत. बाहेरुन अजून काही ट्रामही मागवल्या आहेत. देशभरात जिथं टीम उपलब्ध होतील त्यांना बोलावण्यात येणार आहे,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

- घरात पाणी शिरलं त्यांना मदत करणार आहोत

- कोल्हापुरात पुरातून कुणी वाहून गेले नाही

- 152 ठिकाणी 38 हजार लोक आहेत. तसंच 60 बोटी कोल्हापूर जिल्ह्यात काम करत आहेत

- कोल्हापुरात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे

- पलूस दुर्घटना ग्रामपंचायतने बोट पाण्यात टाकली होती. त्यामध्ये 35 लोक बसले होते. इंजिनमध्ये झाडाची फांदी जाऊन बोट उलटली. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहेत

- गरज पडली तर मुंबईहूनही डॉक्टर पाठवण्याची व्यवस्था करणार

- मी माझी महाजनादेश यात्रा स्थगित केली आहे

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं थैमान घातलं आहे. पाणी साचल्याने अनेक नागरिक घरातच अडकले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

VIDEO : ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेचाच राडा; पोलिसाच्या अंगावर घातली गाडी, मीडियाचा कॅमेराही तोडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या