CM देवेंद्र फडणवीस काही तासांतच पदाचा राजीनामा देणार?

CM देवेंद्र फडणवीस काही तासांतच पदाचा राजीनामा देणार?

विधानसभा निवडणूक निकालानंतर काही दिवसांपत राज्यात नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस हे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज 8 नोव्हेंबरला 13 व्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा अपेक्षित आहेत.

विधानसभा निवडणूक निकालानंतर काही दिवसांपत राज्यात नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही सत्ता स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे थेट राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवणार आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग येईल.

राज्यात सध्या सत्तेवरून कठीण पेच निर्माण झाला आहे. त्यावर राजकीय सल्ला घेण्याचं काम सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज नसते. 8 तारीख संपेपर्यंत मुख्यमंत्री हे त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांना काळजीपाहू मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. पण यातून देवेंद्र फडणवीस कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या

  • India
  • World

India

  • Active Cases

    6,039

     
  • Total Confirmed

    6,761

     
  • Cured/Discharged

    515

     
  • Total DEATHS

    206

     
Data Source: Ministry of Health and Family Welfare, India
Hospitals & Testing centres

World

  • Active Cases

    1,159,488

     
  • Total Confirmed

    1,623,130

    +19,478
  • Cured/Discharged

    366,407

     
  • Total DEATHS

    97,235

    +1,543
Data Source: Johns Hopkins University, U.S. (www.jhu.edu)
Hospitals & Testing centres