मुख्यमंत्री LIVE : देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला उद्धव ठाकरेंचा दावा, म्हणाले...

मुख्यमंत्री LIVE : देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला उद्धव ठाकरेंचा दावा, म्हणाले...

लोकसभेपूर्वी समसमान सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हा उद्धव ठाकरे यांचा दावा फेटाळून लावला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसंच आता पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी गेल्या पाच वर्षांत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नेत्यांचे, प्रशासनाचे आभार मानले. मात्र आभार मानताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेणं टाळलं आहे. तसंच लोकसभेपूर्वी समसमान सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हा उद्धव ठाकरे यांचा दावा फेटाळून लावला आहे.

'माझ्यासमोर शिवसेनेसोबत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हा फॉर्म्युला ठरला नव्हता, या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे. मी उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केले पण त्यांनी ते उचलले नाहीत. आम्ही चर्चेची दारं बंद केली नव्हती. शिवसेनेला आमच्याशी चर्चा करायला वेळ नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

- आम्ही समर्थपणे आव्हानांचा सामना केला

- प्रचंड मोठं काम आम्ही राज्यात करू शकलो

- निवडणुकीत कदाचित अपेक्षेपेक्षा जागा कमी आल्या असतील

- उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवण्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं धक्कादायक विधान केलं

- आम्ही मात्र महायुतीचं सरकार करू असंच म्हटलं होतं

- माझ्यासमोर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद या विषयावर चर्चा झाली नाही. एकदा यावर बोलणं फिस्कटलं होतं. पुन्हा चर्चा झाल्यावर तो विषय आला नव्हता. मी नितीन गडकरी आणि अमित शाह यांना विचारलं ते देखील असे काही ठरलेलं नाहीये असं म्हणाले

- सगळे विषय चर्चिले जाऊ शकले असते पण तसं झालं नाही

- उद्धवजींच्या आजुबाजूच्यांची भाषा अयोग्य. त्यानं मीडीयात जागा मिळते पण सरकार होत नाही

- शिवसेनेची मोदींवर खालच्या दर्जाची टीका

जनतेच्या जनादेशाचा अनादर करणं अयोग्य

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 05:19 PM IST

ताज्या बातम्या