एकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

एकनाथ खडसे राज्यात राहणार की केंद्रात, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी भुसावळला पोहोचली आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकावर जोरदार निशाणा साधला.

  • Share this:

भुसावळ, 24 ऑगस्ट- नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते राज्यात राहणार की केंद्रात हा निर्णय पक्ष घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी भुसावळला पोहोचली आहे. त्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकावर जोरदार निशाणा साधला. तसेच ते स्वत: राज्यात राहणार की केंद्रात जाणार याबाबतही निर्णय पक्षच घेणार असल्याचे सांगितले. मात्र, केंद्रात जाण्याचा योग सध्या दिसून येत नसल्याचे ते म्हणाले.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव व शेगावात सभा मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. नंतर मुख्यमंत्री शेगावात मुक्काम करतील.

विरोधकावर जोरदार निशाणा..

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकावर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते पातळी सोडून बोलतात. विरोधक निष्प्रभ झाल्याची टीका त्यांनी केली. आधी मोदींजींना शिव्या आता EVM वरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अभ्यास करत नाही म्हणून विरोधक परीक्षेत नापास होता, असा टोलाही लगावला. ज्यांना समजलं ते वाट बदलतंय, असे भाजपमधील इनकमिंगवर त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांचे मानले आभार..

सुप्रिया सुळे यांनी मान्य केलं की त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाराची घाण झाली आहे. आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही तर डॅशिंग नेतृत्त्व असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

'सामना'त आलेल्या बातम्यांवर काय म्हणाले...

'सामना'त आलेल्या बातम्यांवर मी प्रतिक्रिया देत नाही. त्यांच्या भाषेत काहीच बदल होत नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगिलले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पाच वर्षांतील कामांचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून 1 ऑगस्टपासून प्रारंभ झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप 31 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले? पाहा VIDEO

First published: August 24, 2019, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading