देवेंद्र फडणवीस 'इन अ‍ॅक्शन', विधानसभा निवडणुकीसाठी आज महत्त्वाची बैठक

देवेंद्र फडणवीस 'इन अ‍ॅक्शन', विधानसभा निवडणुकीसाठी आज महत्त्वाची बैठक

विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : महाराष्ट्रातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची आज मुंबईतील वसंतस्मृती इथं महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधार भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणुकीचा अजेंडा आणि विरोधकांना शह देण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनेनंही विधानसभा निवडणुकीसाठी  तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात काल (शुक्रवारी)शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीतही त्याचदृष्टीने अजेंडा ठरवला गेला का, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगत आहे.

वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 08:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading