मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जिंकावा म्हणून घेतली सभा, आता त्यालाच पाडण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात!

मुख्यमंत्र्यांनी उमेदवार जिंकावा म्हणून घेतली सभा, आता त्यालाच पाडण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात!

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रिपणे लढत असले तरीही या युतीत सर्वच काही आलबेल आहे, असं नाही.

  • Share this:

दिनेश केळुसरकर, सिंधुदुर्ग, 16 ऑक्टोंबर : शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रिपणे लढत असले तरीही या युतीत सर्वच काही आलबेल आहे, असं नाही. काही जागांवर तर शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. असं असतानाही मात्र दोन्ही पक्षाचे नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज सिंधुदुर्गात दोन प्रचार सभा घेणार आहेत. कणकवलीत सतीश सावंत आणि वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी या सभा आहेत. कणकवलीत भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत हे आमने सामने असल्यामुळे उध्दव यांची कणकवलीतली सभा विशेष महत्वाची आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कणकवलीत नितेश राणे यांच्यासाठी सभा घेवून शिवसेनेवर जराही टीका न करता नितेश राणेना 80% मतं मिळतील असा दावा केला होता. शिवाय नारायण राणेनीही 'न्यूज 18लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेशी कटुता संपवायला आपण तयार आहोत अस म्हटलं होतं. पण राणे आणि शिवसेनेचं भांडण पाहता उध्दव ठाकरे कणकवलीच्या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच शिवसेनेसोबत कटुता संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी पुढे यायला तयार आहे. मात्र शिवसेनेनेही हात पुढे करावा असं राणे म्हणाले होते. शिवसेनेने माझ्यावर हल्ले सुरूच ठेवले तर माझ्याही सहनशक्तीचा अंत संपेल असं बोलायलाही ते विसरले नाही. त्याआधी नितेश राणे यांनी पहिल्यांदा आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं स्वागत करत आदित्यच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जुनं राजकीय भांडण आणि कटुता संपवून नवी सुरूवात करायला पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना दिला होता असं त्यांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. किती दिवस या गोष्टी सोबत घेऊन वाटचाल करायची. आता पिढी बदललीय, नव्या गोष्टींची सुरूवात केली पाहिजे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना दिला होता.

VIDEO : मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला

First published: October 16, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading