मुख्यमंत्री कोण असेल याची चिंता करू नका, आमचं सगळं ठरलंय - फडणवीस

मुख्यमंत्री कोण असेल याची चिंता करू नका, आमचं सगळं ठरलंय - फडणवीस

मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत सुरू असताना उद्धव ठाकरे सुद्धा प्रेक्षकामध्ये बसले होते. मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर रितेशने अमृता फडणवीस यांनाही मुलाखतीसाठी बोलवलं आणि नंतर ती मुलाखत आणखी रंगत गेली.

  • Share this:

मुंबई 20 फेब्रुवारी : राजकारणाच्या धकाधकीत राजकीय नेत्यांना विरंगुळ्याचे क्षण फारसे मिळत नाहीत. मात्र काही कार्यक्रमांच निमित्त असतं तेव्हा नेते आपलं मन मोकळं करतात. दैनिक लोकमतच्या एका कार्यक्रमात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी झालेत.  'लोकमत पॉवर आयकॉन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार उद्धव ठाकरेंना देण्यात आला. त्यानंंतर रंगली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतलेली मुलाखत.

रितेशच्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हसत खेळत उत्तर दिलं. पुन्हा कदाचीत युतीची सत्ता आली तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होणार असा गुगली रितेशने टाकला त्यावर मुख्यमंत्र्यी म्हणाले, तुम्ही काहीच काळजी करु नका. सर्व गोष्टी ठरल्या आहेत. प्रत्येक गोष्ट इथे सांगायची नसते. हळूहळू सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढू. सर्व काही चांगलच होईल असंही ते म्हणाले. गेली दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला.

मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत सुरू असताना उद्धव ठाकरे सुद्धा प्रेक्षकामध्ये बसले होते. मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर रितेशने अमृता फडणवीस यांनाही मुलाखतीसाठी बोलवलं आणि नंतर ती मुलाखत आणखी रंगत गेली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

चार वर्षाच्या भांडणानंतर अखेर भाजप-शिवसेनेत युती झाली. त्यानंतर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झालेत. निमित्त होतं दैनिक लोकमतच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं. उद्धव ठाकरेंना 'लोकमत पॉवर आयकॉन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. मुंबईत बुधवारी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार उद्धव ठाकरेंना देण्यात आला.

यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, ''गेली दोन दिवस तोंड बंद आहे. त्यामुळे काय बोलायचं तेच कळत नाही. म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना विचारतो हाऊज् द जोश?'' त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनीच त्यांना टाळ्यांनी दाद दिली. उद्धव ठकारे पुढे म्हणाले,  युतीची खिल्ली उडवणाऱ्यांनी उडवावी. आम्ही मैदानात आल्यावर प्रत्येकाला बघून घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही कशालाही घाबरत नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेणारे आम्ही आहोत. सध्याची वेळ ही राजकारणावर बोलायची नाही. पुलवामा घटनेनंतर देशभर आक्रोश आहे. सरकारने कडक पाऊल उचलाव आणि पाकिस्तानला एकदाचा धडा शिकवावा, सगळा देश त्याची वाट पाहतोय असंही ते म्हणाले. आज मला लोकमतने जो पुरस्कार दिलांय तो मी शिवसैनिकांच्या चरणी अर्पण करतो असंही उद्धव यांनी सांगितलं.

First published: February 20, 2019, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading