मोठी घडामोड : अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 04:35 PM IST

मोठी घडामोड : अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई, 8 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिक बाब म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज राजीनामा दिला. आज 8 नोव्हेंबरला 13 व्या विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी आज राजीनामा देणं अपेक्षित होतं.

विधानसभा निवडणूक निकालानंतर काही दिवसांत राज्यात नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही सत्ता स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता संपूर्ण मंत्रिमंडळ हे बरखास्त होईल. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग येईल.

राज्यात सध्या सत्तेवरून कठीण पेच निर्माण झाला आहे. त्यावर राजकीय सल्ला घेण्याचं काम सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्याला राजीनामा देण्याची गरज नसते. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. पण यातून देवेंद्र फडणवीस कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

CM फडणवीस पत्रकार परिषद घेणार

Loading...

सत्तास्थापनेत मोठी कोंडी निर्माण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं, असा दावा विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य करताना दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आपलं वक्तव्य मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपकडून ड्राफ्टही तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे.

VIDEO : शिवसेनेसोबत चर्चा झाली का? जयंत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...