मुंबई, 04 जून: गुरुवारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या अनलॉकच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाला. अनलॉकच्या घोषणेमुळे झालेल्या या गोंधळावर काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारनं घेतलेल्या अनलॉकच्या यू टर्नवर थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी झालेल्या गोंधळानंतर आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसचे नेते- मंत्री हे वरिष्ठ आहेत. त्यांना अनुभव देखील आहे. त्यांच्या बाबत काही परिसंवाद असेल तर मुख्यमंत्री मी आणि काँग्रेसचे मंत्री आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि संवाद वाढवू. सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- नागपूर क्राईम: भरदिवसा पेट्रोल पंपवर गुंडांचा हैदोस, घटना CCTVत कैद
काँग्रेसमध्ये नाराजी
विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. यावरून देखील काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत नाराजी आहे. यापूर्वीच आरक्षण पदोन्नती अध्यादेशावरून नितीन राऊत यांनी घेतलेली आक्रमक पवित्रा एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे पदोन्नतीचे निर्णय वारंवार घेतली जात आहेत, अध्यादेशाला अद्यापही स्थगिती देण्यात आली नाही. याचाच अर्थ काँग्रेसच्या मंत्र्यांनी वेगवेगळी भूमिका मुद्दे मांडले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मात्र त्यास फारसा प्रतिसाद देत नाही हे दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Congress, Shivsena, Uddhav thackarey