आघाडी सरकारच्या कर्जमाफीत आमदाराच्या घरातील 4 लाभार्थी-मुख्यमंत्री

आघाडी सरकारच्या कर्जमाफीत आमदाराच्या घरातील 4 लाभार्थी-मुख्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी 37 लाखांची कर्जमाफी मिळवल्याचंही त्यांनी नावांसह सांगितलं.

  • Share this:

नागपूर,15 डिसेंबर: आघाडी सरकारनं दिलेल्या शेतकरी कर्जमाफीत आमदाराच्या घरातील चार जण लाभार्थी असल्याचा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. शेतकरी कर्जमाफीवर माहिती देताना त्यांनी विधानसभेत हा आरोप केला.

सध्या नागपूरला राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. खरंच कर्जमाफी झाली आहे का असा प्रश्नही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारने आमदारांची कर्जमाफी केली असा आरोप केलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी 37 लाखांची कर्जमाफी मिळवल्याचंही त्यांनी नावांसह सांगितलं. भाजप सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना बंद झाली नसून आताही जो शेतकरी अर्ज करील त्या शेतकऱ्याला कर्जमाफी देणार असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

First published: December 15, 2017, 9:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading