अख्ख्या नाशिकमध्ये फक्त 'या' दोघांच्या नावाची चर्चा, वाचून तुम्हीही म्हणाल लयभारी!

अख्ख्या नाशिकमध्ये फक्त 'या' दोघांच्या नावाची चर्चा, वाचून तुम्हीही म्हणाल लयभारी!

प्लास्टिकच्या डब्यामध्ये चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या, तो डब्बा चुकून कचऱ्यात टाकला गेला आणि...!

  • Share this:

लक्ष्मण घटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 17 डिसेंबर : जगात प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आपण बघितली असतील. असंच एक उदाहरण नाशिकमध्ये दिसून आलं आहे. एक प्रामाणिक घंटागाडी चालक उमेश दोंदे आणि त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यावर सध्या नाशिकरांचा कौतुकाचा वर्षाव होतोय. एका घंटागाडी कर्मचाऱ्याने कचऱ्यात आलेल्या लाखो रुपयांचे दागिने परत करून प्रामाणिक पणाच उदाहरण समोर ठेवलं आहे.

दर दिवसाला शहरातील कचरा गोळा करणं आणि तो घंटागाडीत भरून कचरा डेपोत नेऊन टाकणं हे या कर्मचाऱ्यांचं दैनंदिन काम. मात्र, घडलं असं की पाथर्डी परिसरातील दामोदर नगर परिसरात घंटागाडी गेली आणि परिसरातील एका गृहिनेने आपल्या घरातील कचरा घंटागाडीत टाकला. परंतु त्या कचऱ्यात त्या गृहिनीकडून चुकून घरात असणाऱ्या चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या ही टाकल्या गेल्या. प्लास्टिकच्या डब्यामध्ये बांगड्या ठेवल्या होत्या, तो डब्बा चुकून कचऱ्यात टाकला गेला.

इतर बातम्या - ना महामार्ग ना सावित्री पूल, गडकरींचं आश्वासन हवेत विरलं!

परिसरतील कचरा गोळा झाल्यानंतर घंटागाडी त्या परिसरातून निघून गेली. मात्र काही वेळेनंतर ते महिलेच्या लक्षात आलं की आपल्या सोन्याच्या बांगड्या या कचऱ्यातच गेल्या असाव्या. महिलेने तात्काळ कचरा डेपो गाठला आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या चुकीबद्दल सांगितलं. मात्र प्रामाणिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घंटागाडी खाली करून त्या महिलेच्या बांगड्या शोधून त्यांच्या हातात सुपूर्द केल्या.

इतर बातम्या - कारमध्ये सिगारेट पेटवून फवारला एअर फ्रेशनर, त्यानंतर जे झालं ते वाचून धक्का बसेल

घंटागाडी कर्मचारी उमेश दोंदे आणि ज्ञानेश्वर साळुंखे यांचं सर्वत्र कौतुक होतं आहे. चुकन त्या महिलेकडून कचऱ्यात दागिने आले होते मात्र आम्ही प्रामाणिकतेणे काम करतो. अनेक वेळा नागरिकांच्या महत्वाच्या वस्तू कचऱ्यात आल्या आहेत. मात्र, आम्ही त्या कधीही आमच्याकडे ठेवलेल्या नाही. त्या तात्काळ परत केल्या असल्याचंदेखील या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

गेल्या अनेक वर्षांपासून दामोदर नगर परिसरात काम करणाऱ्या या घंटागाडी कर्मचाऱ्यांचं नागरिकदेखील भरभरून कौतुक करताहेत. कोणत्याही मोहाला बळी न पडता घंटागाडी कर्मचाऱ्यांनी महिलेच्या चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या परत केल्या. त्यामुळे त्यांच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र भरभरून कौतुक होतं आहे.

इतर बातम्या - अपहरण करून 8वीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, नंतर 50 हजारांना विकलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Dec 17, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या